ताज्या बातम्या
कराडला जनजागृतीचा इव्हेंट . || आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. ||
लंपी मुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना मिळणार अर्थसहाय्य
  • प्रकाश शिंदे
  • Tue 27th Sep 2022 06:43 am

सातारा :  गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लंपी त्वचा रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी व पशुपालकांच्या मृत पावलेल्या पशुधनास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचा आदेश राज्याच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने काढला असून त्यासाठी जिल्हास्तरावर मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव राज्यातील 21 जिल्ह्यात झपाट्याने पसरला आहे. उद्भवलेल्या लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहेत. लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी व पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झाला आहे अशा शेतकरी पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे 100 टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याबाबत व त्याची अमंबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे आदेश मंत्रीमंडळाच्या बैठकीत देण्यात आले आहेत.

लंपी त्वचारोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचा शेतकरी, पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखन्यावरील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस-पाटील, तसेच स्थानिक दोन नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा करुन घ्यावयाचा आहे. या पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लंपीमुळे झाला असल्याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. समितीने पंचनाम्याच्या आधारे खातरजमा करुन संबंधित शेतकरी व पशुपालकांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी शिफारस करुन पंधरा दिवसाच्या आत संबंधित पशुपालकांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा करावी. दुधाळ जनावरे गाय व म्हैस प्रत्येकी 30 हजार रुपये (3 मोठी दुधाळ जनावरांसाठी), बैल 25 हजार रुपये (3 मोठी जनावरांपर्यंत), वासरे 16 हजार रुपये (6 लहान जनावरांसाठी) असे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

कशी राहणार समिती


जिल्हास्तरावरील समितीमध्ये जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकार्‍यांनी
नामनिर्देशित केलेला उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जि. प. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय (संबंधित) हे सदस्य तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत



©2025. All Rights Reserved.