सातारा : सातारा पोलिस दलाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त 'हर घर तिरंगा' या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी सातारा शहरातून रॅली काढण्यात आली.पोलीस मुख्यालय येथे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून रॅली चा शुभारंभ करण्यात आला.. यावेळी जिल्हा पोलीस दलातील पोलिसांनी सातारा शहरातून हातात तिरंगा घेऊन पायी चालत संचालन केलं.. पोलीस मुख्यालय,पोवई नाका मार्गे राजवाडा अशी तिरंगा रॅली काढण्यात आली त्यावेळी सातारा शहरातील पोलीस, होमगार्डस व रोड सेफटी पेट्रोलच्या विध्यार्थ्यांनी पोलिसांच्या जनजागृती रॅली मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी क्साले होते.
©2025. All Rights Reserved.