पुसेगाव : वर्धनगड तालुका खटाव येथे 15 ऑगस्ट अमृत महोत्सवी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वर्धनगड येथील प्राथमिक केंद्र शाळेचा ध्वजारोहण, हुतात्मा स्मारक, विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत किल्ले वर्धनगड, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांचे ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात व मोठ्या जन समूहाच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आले.आज गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर आज या 75 व्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत होता,तर आनंदीमय उत्साह पूर्वक वातावरण यामुळे या स्वातंत्र्य दिनाला विविध कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले होते.
. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर वर्धनगड केंद्र शाळेच्या प्रांगणामध्ये प्राथमिक केंद्र शाळा वर्धनगड यांचे वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास ग्रामस्थांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर ग्रामपंचायत किल्ले वर्धनगड यांचे वतीने विविध परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात, या कार्यक्रमास सरपंच अर्जुन मोहिते, उपसरपंच शंकर घोरपडे, ग्रामसेविका आरए ढेंबरे, सोसायटीचे चेअरमन नलेश जाधव, आरपीआय तालुकाध्यक्ष प्रशांत शिवशरण, माजी उपसरपंच शंकर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रियाज शिकलगार, केंद्रप्रमुख जगदाळे सर, जि प केंद्र शाळा मुख्याध्यापक नंदा शिंदे, वर्धनी विद्यालयाचे प्राचार्य यु डी भोसले, विक्रम कुंभारसर, ए मुल्लासर, प्रदीप पवार, अक्षय मोहिते, दादा घोरपडे, जिल्हा परिषद केंद्र शाळा,वर्धनी विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी, तसेच गावातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
©2025. All Rights Reserved.