सातारा : येथील कोरेगाव रस्त्यावरील वेदभवन मंगल कार्यालय येथे हिंदू जनजागृती समितीच्या आरोग्य सहाय्य समितीच्या वतीने ‘अचानक येणार्या हृदयविकार झटक्यावर प्राथमिक उपचार देण्यासाठी सीपीआर प्रशिक्षणा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अखिल भारतीय भूल शास्त्रतज्ञ संघटना सातारा शाखेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी लिमये, सचिव डॉ. वैशाली चव्हाण, भूलतज्ञ डॅा. समीर विजय सोहनी यांनी हे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचा ७० जणांनी लाभ घेतला.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सौ. रूपा महाडिक यांनी परिचय करून दिला, तर सौ विद्या कदम, सौ भक्ती डाफळे, श्री हेमंत सोनावणे यांनी पुष्प, श्रीफळ आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. माधुरी लिमये या मार्गदर्शन करताना म्हणाल्या, "जीवन संजीवनी प्रशिक्षण म्हणजेच हृदय व श्वास बंद पडल्यावर केले जाणारे प्रथमोपचार ! हे प्रथमोपचार असल्यामुळे यासाठी कुठलीही शेक्षणिक पात्रता, साधने याची आवश्यकता नाही. केवळ कोणाचातरी जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा असली पाहिजे."
डॉ. वैशाली चव्हाण यांनी प्रशिक्षण देताना कशा पद्धतीने रुग्णांना हाताळायचे आणि कशी सावधगिरी बाळगायची याविषयी मार्गदर्शन केले. डॅा. समीर विजय सोहनी यांनी प्रत्यक्ष करायची कृती डमीवर (बाहुल्यांच्या स्वरूपातील निर्जीव मनुष्य) करून दाखवले. यानंतर उपस्थित ७० प्रशिक्षणार्थींनी चार गटांमध्ये चार डमींवर सीपीआर आणि आपत्कालीन उपचार करून प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव घेतला.
आपला नम्र,
आरोग्य साहाय्य समिती करता,
(हेमंत सोनावणे - ८३७८०४३४१८)
©2025. All Rights Reserved.