कराड: कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या बाजार समितीची अंतिम मतदार यादी प्रकाशित प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार ४ हजार २०९ मतदार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
कराड बाजासमितीच्या राजकीय हालचाली गतीमान
- अंतिम मतदार यादी प्रसिद्ध;
४ हजार २०९ मतदार वाजवणार मतदानाचा हक्क
कराड:
कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या बाजार समितीची अंतिम मतदार यादी प्रकाशित प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार ४ हजार २०९ मतदार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष आहे. गत वेळी असलेली राजकीय परिस्थिती आणि सध्याची परिस्थितीत खूप वेगळेपण आहे. गत वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे हे एकत्रित होते. तर विरोधात माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर व स्व. जयवंतराव भोसले (डॉ अतुल भोसले सुरेश भोसले ) यांचे गटाचे पॅनल होते. परंतु, या वेळची परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतः लक्ष घालतील, असे बोलले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहणाऱ्या पॅनेलला भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची साथ राहणार आहे.
स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या निधनामुळे बाजार समितीची निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उदयसिंह पाटील-उंडाळकर गट लढणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विरुद्ध माजी सहकार मंत्री असा सरळ सामना होण्याची शक्यता आहे.
गतिवेळच्या निवडणुकीचा विचार करता माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील यांनी तत्कालीन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव करून १०० ते १५० फरकाच्या मताने सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतरच्या काळात उंडाळकर गट हा काँग्रेस पक्षात सामील झाला. काका -बाबा गट एकत्र आले आहेत. तर जिल्हा मधवर्ती बँकेच्या निवडणुकीपासून माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांचे डॉ. अतुल भोसले यांचेशी सख्खे जुळले आहे.
कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीसाठी एकूण ४ हजार २०९ मतदार आहेत. या मतदारातून एकूण १८ सदस्य निवडले जातात.
सोसायटी मतदारसंघ- ११ संचालक
ग्रामपंचायत गट- ४ संचालक
व्यापारी अडते गट- २ संचालक
हमालमापाडी गट- १ संचालक
असे आहे मतदान
मतदार संघ रचना....
सोसायटी मतदारसंघ
ग्रामपंचायत मतदार संघ
हमाला मापाडी मतदार संघ -१
व्यापारी मतदार संघ- २
होऊ घातलेल्या निवडणुकीत विरोधात बाळासाहेब पाटील यांचा गट विरोधात आक्रमकपणे लढा देण्याच्या तयारीत आहे. त्या दृष्टीने दोन्ही गटांनी तयारी केली आहे.
सद्यस्थितीत कराड दक्षिण व कराड उत्तर मतदार संघातील राजकीय गणिते पाहता कराड दक्षिणेत राष्ट्रवादी भाजपबरोबर व कराड उत्तर मध्ये भाजप काँग्रेस बरोबर असे चित्र आहे. कोणत्याही स्थितीत सत्ता राखायची या निर्धाराने उदयसिंह पाटील यांनी तयारी सुरू केली आहे.
©2025. All Rights Reserved.