पंचनामा होण्यापुर्वीच डंपर गायब सदर अपघात झाल्याची खबर पावनण ग्रामस्थांना समजताच समजताच ग्रामस्थांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींना म्हसवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले तर काही ग्रामस्थांनी डंपरला वेडा दिला मात्र पोलीस घटनास्थळी आल्यावर डंपर तेथुन गायब झाला तो डंपर पोलीसांनीच गायब केल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला.
म्हसवड : म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील पानवण फाटा याठिकाणी सकाळी ७ च्या सुमारास वाळुने भरलेल्या डंपरने दुचाकीवरुन शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना समोरुन जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील तीन ही शालेय विद्यार्थी गंभिररित्या जखमी झाले असुन यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, दरम्यान या अपघाताची खबर देवुनही पोलीस, अन महसुलचे अधिकारी कोणीही लवकर न आल्याने पानवण ग्रामस्थांकडुन तीव्र संताप व्यक्त करण्यात आला, यानंतर तहसिलदार यांच्या गाडीलाच संतप्त ग्रामस्थांनी घेराव घालत संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली अधिक माहिती अशी पानवण ता. माण येथील इयत्ता १२ वी मध्ये शिकणारे समाधान राधाप्पा नरळे, शुभम दादासो चव्हाण, सुधीर शामराव शिंदे हे १८ वर्षीय शालेय विद्यार्थी असुन ते देवापुर ता. माण येथील विद्यालयात शिकत आहेत, नेहमीप्रमाणे ते शाळेत जादा तास असल्याने सकाळी ७ च्या सुमारास घरातुन दुचाकी क्र.एम एच.४२, एन- ५२०१वरुन देवापुर येथे निघाले असताना त्यांची दुचाकी गंगोती फाट्याजवळ आली असता समोरुन वाळुने भरलेल्या भरधाव डंपर क्र. एम.एच. -११ ए.एल.- ४८४५ ने त्यांना जोरात धडक दिली, या धडकेत अक्षरशा तिन ही मुले फुटबॉल प्रमाणे उडुन बाजुला पडली यामध्ये तीन ही विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत, यापैकी शुभम चव्हाण व सुधीर शिंदे यांना म्हसवड येथिल खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे तर समाधान नरळे यास पुढील उपचारार्थ प्रथम अकलुज येथे नेण्यात आले मात्र तेथे त्याची प्रकृती अधिक गंभीर बनल्याने त्याला तेथुन पंढरपुर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान माण तालुक्यात वाळु उपसा बंद असल्याचे वारंवार महसुल विभागाकडुन सांगितले जात असताना आज मात्र या अपघातामुळे महसुल विभागाचे पितळ उघडे पडल्याचे चित्र आहे. तर संबधित डंपर चालकावर पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन त्यास ताब्यात घ्यावे अन्यथा पोलीस स्टेशन समोरच आंदोलन करु असा इशारा पानवण ग्रामस्थांनी दिला आहे. तर या अपघाताची चौकशी करुन संबधित डंपर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हसवड चे स.पो.नि. बाजीराव ढेकळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महसुल विभागाचे पोलीसांकडे बोट
माण तालुक्यात वाळु उपसा बंद असल्याचे महसुल विभाग सांगत असताना वाळुचे डंपर कोठुन भरले जातात याविषयी माणचे तहसिलदार सूर्यकांत येवले यांना विचारले असता महसुल विभाग आपले काम चोखपणे करीत आहे मात्र पोलीसांनीच वाळुसम्राटांशी हातमिळवणी केली असल्याने असे प्रकार घडत असल्याचे सांगत याबाबत थेट पोलीसांकडेच बोट केले.
पंचनामा होण्यापुर्वीच डंपर गायब
सदर अपघात झाल्याची खबर पावनण ग्रामस्थांना समजताच समजताच ग्रामस्थांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींना म्हसवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले तर काही ग्रामस्थांनी डंपरला वेडा दिला मात्र पोलीस घटनास्थळी आल्यावर डंपर तेथुन गायब झाला तो डंपर पोलीसांनीच गायब केल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला.
©2025. All Rights Reserved.