परळी : सज्जनगडावर बिबटय़ाचा बछडा सापडलेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री 8 च्या दरम्यान सज्जनगडच्या डोंगरात बळीपवाडीच्या वरच्या बाजुला जखमी अवस्थेत बिबटय़ाचा छोटा बछडा असल्याचे माहिती वनविभागाला समजली वनविभागाचे वनपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपरिमंडल अधिकारी अरुण सोळंकी, वनरक्षक साधना राठोड यांनी घटनास्थळी जावऊन बछडय़ाची पाहणी केली यावेळी बछडय़ाच्या शेपटीला जखम झाली होती. ग्रामस्थांनी या परिसरात दोन बछडे फिरत असल्याची माहिती वनअधिकाऱयांना दिली मात्र हा बछडा तिथेच सोडून येण्याच्या स्थितीत नव्हता त्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी शिरवळ येथील दवाखाण्यात दाखल केल्याची माहिती वनपाल निवृत्ती चव्हाण यांनी दिली.
©2024. All Rights Reserved.