पाचगणी : पाचगणी थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणी महाबळेश्वरला बॉलीवूड पासून अंडरवल्ड पर्यंत लोकांना अनेक वर्षापासून भुरळ पडलेली आहे अनेक बड्या नेत्यांपासून ते बॉलीवूडच्या दिग्गज हीरो हीरोइन पर्यंत तसेच अंडरवर्ल्डच्या काही लोकांनाही आपला बंगला मालमत्ता महाबळेश्वर पाचगणीत असावा अशी मनमानी इच्छा असते काहींचे बंगले व मोठमोठ्या प्रॉपर्टीज महाबळेश्वर पाचगणीच्या पर्यटन क्षेत्रावर आहेत के लपले नाही, मात्र अशा काही पुण्या मुंबईसह इंटरनॅशनल लेवलच्या दिग्गज गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या मालमत्ता प्रॉपर्टीज महाबळेश्वर पाचगणी मध्ये आहेत मात्र प्रॉपर्टीज ज्यांनी अश्या मालमत्ता घेतल्या तेव्हा पासून काही मंडळी स्वतःच्या प्रॉपर्टीजमध्ये कधीच फिरकलेच नाहीत अशा काही घटना देखील आहे, यामधील काही मृत झाले,तर काही गायब झाले, तर काहींचा पत्ता अद्यापही लागलाच नाही अशाच घटनांचा फायदा घेत काही स्थानिक लोकल एजंट यंत्रणा व गावगुंड पुढाऱ्यांनी मात्र या मध्ये चांगलाच हात धुवून घेतलाय आहे अशा बेनामी प्रॉपर्टी मध्ये बनावट माणसं उभी करून रजिस्टर ऑफिस मधून संबंधित जमिनीचे कागदपत्र काढून खोटे दस्त केले असल्याच्या खळबळ जनक माहिती समोर आली आहे
या संदर्भात पाचगणी महाबळेश्वर पोलीस स्थानकामध्ये संबंधित मूळ मालक व त्यांचे नातेवाईक आपली घेतलेली मूळ मालमत्ता जमीन घेण्याचे साठी पोलिसांकडे व संबंधित यंत्रणेकडे मदतीचा हात मागत आहेत
मात्र पोलीस यंत्रणाही संबंधितांना कात्रज चा घाट दाखवत असल्याचेही मूळ मालक सांगत आहेत याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांनी यावर विशेष लक्ष देऊन ही संबंधित बोगस टोळ्या व अशा टोळक्यांवर कारवाया करत त्यांना गजाआड करावे अशी मागणी देखील होऊ लागली आहे
पाचगणी महाबळेश्वर या ठिकाणी पूर्वीपासून बेनामी मालमत्ता प्रॉपर्टीज बऱ्याच जागा आहेत काही बंद बंगले देखील आहेत
वर्षानुवर्ष अशा बंगल्यांवर व जमिनीवर कोणी फिरकले देखील नाही यातच अशा मोकळ्या जमिनीवर पत्र्याची शेड टाकायची व कब्जा करायचा असा टोळक्याकडून फँडा होत असतो त्यातूनच अनेक मोठमोठाली क्राईम दाखल असल्याचे घटना ताज्या आहेत तसेच कालांतराने मुंबई पुण्याकडील व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बऱ्याच जागा घेतल्या होत्या दरम्यानच्या काळात सदर जागा मालक वर्षानुवर्ष या ठिकाणी आले नाहीत याची माहिती काही गावगुंड स्थानिक पुढारी जागा विक्रीचे एजन्ट यांना मिळाल्याने सदरच्या ताब्यात घेण्यासाठी टोळ्या सक्रिय झाल्या व त्यांनी गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये अशा शेकडो जागा खोटी माणसे उभी करून बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केल्या पाचगणी परिसरातील घटना घडल्या आहेत यामध्ये काही प्रतिष्ठित व्हाईट कॉलर वाले यामध्ये समाविष्ट आहेत
सदर जागा विक्री झाल्यानंतर जागा मालक आणि त्यांचे नातेवाईकांना याबाबत माहिती मिळाली असतात त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली प्रशासनाने त्यांना न्याय देण्याचे सोडून त्यांनाच वेळोवेळी सेटलमेंट करून देतो असे प्रकार यंत्रणे कडून घडू लागले आहेत याकडे आता जिल्हा पोलीस प्रशासनाने लक्ष टाकणे* गरजेचे आहे मालमत्ता प्रॉपर्टी च्या मूळ मालकांना वेगवेगळी कागदपत्रे आणण्यासाठी त्यांची तक्रार भरकटविण्यासाठी यंत्रणा नामी शक्कल लढवत आहे व मूळ मुद्द्याला बगल देत आहे
यंत्रणे करून होणारी टाळाटाळ त्यामुळे त्रस्त झालेल्या मूळ मालकांना खऱ्या जागा मालकांना न्याय कोण देणार हा खरा प्रश्न आहे
©2025. All Rights Reserved.