वेणेखोल : तालुक्यातील वेणेखोल ग्रामपंचायतीवर वंचित संघर्ष मोर्चाचा सरपंच बिनविरोध पहिला वहिला झाल्याने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जिल्हा संयोजक चंद्रकांत खंडाईत यांच्या हस्ते सरपंच सौ.नलीनी सपकाळ व सदस्य गणेश सपकाळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. चंद्रकांत खंडाईत म्हणाले,"फुले - शाहु - आंबेडकर विचारानुसार कायम साथ देणारे गाव म्हणून वेनेखोल गावाची ओळख आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आपल्या विचारानुसार ग्रामपंचायत सदस्य काम करीत आहेत.तेव्हा वेनेखोल गावाच्या पाठीशी तालुका ठाम राहील. गोर - गरीबांच्या कल्याणार्थ कार्यकर्त्यानी कटिबद्ध राहिले पाहिजे." तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे यांनी स्वागत केले.पांडुरंग सकपाळ यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड, महासचिव सुनील कदम,सुधाकर काकडे,गणेश कारंडे,तालुका महासचिव वसंत खरात,राजेंद्र सकटे,सुनील निकाळजे,प्रकाश सकपाळ, द्राक्षा खंडकर,उषा उघडे,आशा यादव, कल्पना कांबळे,सतीश सपकाळ,सायली भोसले,लक्ष्मी सपकाळ, तुळशीराम सपकाळ, इंदूबाई सपकाळ,रमेश गायकवाड, रिया सपकाळ, शोभा सपकाळ आदीं पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
©2025. All Rights Reserved.