दहिवडी : माण तालुक्यातील दिडवाघवाडीच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळाबाई दिलीप दिडवाघ यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच तात्यासाहेब आदिकराव दिडवाघ यांनी विहित कालावधी मध्ये त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सदरचे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी एक विशेष मिटींग सरपंच सुखदेव दिडवाघ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . यामध्ये मिटींगमध्ये बाळाबाई दिडवाघ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक विजय काटकर यांनी पाहिले आहे
यावेळी रुक्मिणी दिडवाघ , हौसाबाई सरगर , मालन सरगर , अजिनाथ सरगर , तात्यासाहेब दिडवाघ आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक विजय काटकर यांनी बाळाबाई दिडवाघ यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
बाळासाठी दिडवाघ यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख साहेब , युवा नेते मनोज दादा पोळ , माण तालुका मार्केट कमिटीचे संचालक व माजी सरपंच बाळासाहेब काळे , पोपट दिडवाघ , लाला आप्पा दिडवाघ , अजिनाथ सरगर , हणमंत दिडवाघ , दिलीप दिडवाघ , अमोल रासकर , संजय गोरड , महेश दिडवाघ , भगवान दिडवाघ , दत्तू सरगर , सागर मदने , प्रकाश ढेंबरे आदींनी अभिनंदन केले आहे.
©2025. All Rights Reserved.