पुसेगाव : स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त वर्धनगड येथे आज 13 ऑगस्ट रोजी वर्धनगड प्राथमिक केंद्र शाळा वर्धनगड, वर्धनी विद्यालय , हुतात्मा स्मारक, विविध कार्यकारी सोसायटी , ग्रामपंचायत वर्धनगड, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, येथील ध्वजारोहण वर्धनी विद्यालय व प्राथमिक केंद्र शाळा येथील विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये उत्साह पूर्वक वातावरणात संपन्न करण्यात आला. याच दरम्यान सरपंच अर्जुन मोहिते यांच्या मातोश्री या निवासस्थानी. व माजी सरपंच शफिया शिकलगार यांचे निवासस्थानावरतीही ध्वज फडकवण्यात आले.
. आज देशाचा 75 वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिवस या निमित्त शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे दिनांक 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत ध्वज फडकवण्यासाठी सूचना जारी केल्या. त्यास अनुसरून आज वर्धनगड येथे वर्धनगड हुतात्मा स्मारकामध्ये माजी सैनिक यशवंत हुजरे यांचे वतीने ध्वज फडकविण्यात आला. तर सोसायटीचा ध्वज नूतन चेअरमन निलेश जाधव सह संदीप पाचंगणे व संचालकाच्या उपस्थितीमध्ये अंकुशराव पाचांगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वर्धनगड ग्रामपंचायत ध्वजारोहण सरपंच अर्जुन मोहिते,उपसरपंच शंकर घोरपडे, ग्रामसेविका आर ए ढेंबरे, कर्मचारी चांगदेव जाधव, राजू शिकलगार, शिवाजी सरनाईक व ग्रामस्थ यांचे उपस्थितीमध्ये गफूरभाई शिकलगार यांचे हस्ते करण्यात आले तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा ध्वज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुपरवायझर निगडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. याच दरम्यान सरपंच यांच्या निवासस्थानावरील ध्वजारोहण सरपंच अर्जुन मोहिते तर माझी सरपंच शफिया शिकलगार यांच्या घरावरील हाशम शिकलगार यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. प्रशासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास प्राथमिक केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख जगदाळे सर, मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग व विद्यार्थी तसेच वर्धनी विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वर्ग विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने येथील हुतात्मा स्मारकामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. सकाळच्या प्रहरामध्ये पावसाची रिमझिम व धुकेमय वातावरणामुळे वर्धनगड व परिसरातील वातावरण निसर्गरम्य झाले होते. या वातावरणामध्ये विद्यार्थ्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. हलकीशी हवा असल्याकारणाने ध्वज फडकवल्याने तिरंगा हवेमध्ये चांगले पद्धतीने लहरीत होता. आज या अमृत महोत्सव निमित्त विविध ठिकाणचे ध्वज विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मोठे आनंदामध्ये व उत्साह पूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रमास विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
©2025. All Rights Reserved.